महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना आमदार करण्यासाठी सांगोला तालुक्यातील दोन ते अडीच हजार धनगर समाज बांधवांनी आरेवाडी ता.कवठेमंकाळ येथील श्री बिरोबा देवाला साकडे घातले. यावेळी दिपकआबांसह धनगर समाज बांधवांनी बिरोबाच्या नावाने चांगभलंचा गजर करीत आरेवाडीच्या बनात बिरोबाचे दर्शन घेतले.
यावेळी धनगर समाज बांधवांनी बिरोबा देवाला नैवेद्य अर्पण करून अभिषेक करून दिपकआबा साळुंखे पाटील यांना आमदार करण्याची शपथ घेतली. यावेळी धनगर समाज बांधवांच्या वतीने पारंपारिक घोंगडं, काठी, ढोल, काठी देऊन दिपकआबांचा सत्कार करण्यात आला.ढोलाच्या गजरात, भंडारा उधळीत बिरोबाच्या नावाने चांगभलं असा गजर करीत सांगोला तालुक्यातील २ हजार धनगर समाज बांधवांनी आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना आमदार करण्याची शपथ घेतली.
यावेळी धनगर समाज बांधवांनी पारंपारिक घोंगडं, काठी, ढोल देऊन दिपकआबांचा सत्कार करून धनगर समाज बांधव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे अशी ग्वाही दिली. यावेळी धनगर समाज बांधवांनी सांगितले की, दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आयुष्यभर जात-पात, धर्म, पार्टी न पाहता उपेक्षीत धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली.
दिपकआबांनी गणपतराव देशमुख यांना २५ ते ३० वर्षे मदत केली. त्यामुळे आम्ही दिपकआबांना आमदार करण्यासाठी शपथ घेत आहोत असे सांगत धनगर समाज बांधवांनी भंडाऱ्याची उधळण केली. कुणी कितीही देव पाण्यात घातले तरी सूर्य उगवल्याशिवाय राहत नसतो असे सांगून यंदा दिपकआबांना आमदार करणारच अशी बिरोबा देवासमोर शपथ घेतली. यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावातील धनगर समाज बांधवांसह भाळवणी गटातील सोनके, तिसंगी, केसकरवाडी, शेंडगेवाडी येथील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.