मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघातून शरद पवार पक्षातून अनिल सावंत हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची बातमी समोर येत आहे.दरम्यान, काल काँग्रेस पक्षाने भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली असून आज महाविकास आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादी पक्षामार्फत अनिल सावंत आज दुपारी 2 वाजता अर्ज भरणार आहेत. मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
दरम्यान, मंगळवेढा-पंढरपूर या मतदारसंघावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने हक्क दाखवला असून 2019 ला व 2021 ला राष्ट्रवादीने ही निवडणूक लढवली गेली आहे.
शरद पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. पवार साहेबांच्या आदेशाने ही निवडणूक मोठ्या ताकदीनिशी लढवणार आहे असे अनिल सावंत यांनी स्पष्ट केले.