दिवाळी हा दिवे आणि फटाक्यांचा सण आहे. दिवाळीच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात फटाके फोडून सेलिब्रेशन करतात. अनेक वर्षांपासून दिवाळीत फटाके फोडण्याची परंपरा सुरु आहे. अनेकदा फटाके फोडताना आणि दिवे लावताना दुर्घटना होते. दीव्यामुळे अनेकदा घरात आग लागते, तर फटाके वाजवताना काही लोक जखमी होतात. दिवाळीच्या दिवसात अशा दुर्घटनांमुळे काही लोकांनी आपले प्राणही गमावले आहेत.
इतरवेळी अशी दुर्घटना झाल्यास इंश्यूरन्स कव्हर मिळतं. पण दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी कुठलं इंश्यूरन्स कव्हर असतं का? जर याचं उत्तर ‘हो’ असेल, तर क्लेम करण्याची प्रोसेस जाणून घ्या.दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांसाठी UPI APP वर इंश्यूरन्स उपलब्ध आहे. या इंश्यूरन्सद्वारे तुम्ही होणाऱ्या नुकसानीची भरपाई करु शकता. दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांसाठी फोन पे ने फायरक्रॅकर इंश्यूरन्स लॉन्च केलाय. या इंश्यूरन्सची वॅलिडिटी फक्त 10 दिवसांची आहे. म्हणजे इंश्यूरन्स विकत घेतल्यानंतर तुम्हाला 10 दिवसातच क्लेम करावा लागेल.
दिवाळी काळात एखादी दुर्घटना झाल्यास तुम्ही फोन पे च्या फायरक्रॅकर्स इंश्यूरन्सचा वापर करु शकता. या अंतर्गत तुम्हाला 25000 रुपयांच हॉस्पिटलायजेशन आणि एक्सीडेंटल डेथ कवरेज मिळेल. या इंश्यूरन्स पॉलिसीमध्ये पॉलिसी होल्डर पती, पत्नीसह दोन मुलांना कवरेज मिळतं.फोन पेचा फायरक्रॅकर इंश्यूरन्स अन्य इंश्यूरन्सपेक्षा खूप स्वस्त आणि वेगळा आहे. त्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम खर्च करण्याची गरज नाही.
तुम्ही फक्त 9 रुपयांचा प्रीमियम भरून ही इंश्यूरन्स पॉलिसी वापरु शकता. 25 ऑक्टोंबरपासून हा प्लान लाइव आहे. जर कोणी हा प्लान त्या दिवसानंतर विकत घेतला, तर वॅलिडिटी विकत घेतलेल्या दिवसापासून सुरु होईल.