राज ठाकरे यांची मोठी भविष्यवाणी, शिंदे-दादांना धाकधूक….

निवडणूक निकालानंतर विजयाचा दावा करत मनसे भाजपसोबत सत्तेत जाण्याचा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केलाय. त्यामुळे आता मनसेनं भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेविरोधात  उमेदवार दिलेले असले तरी आपण निकालानंतर भाजपसोबत सत्तेत असू किंवा आमच्या साथीनंच भाजपचा मुख्यमंत्री बनेल. असं राज ठाकरेंनी म्हटलंय. मनसे सत्तेत राहणार हे राज ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून ठामपणे सांगतायत. दुसरीकडे त्यांचे पुत्र अमित ठाकरेंनी मात्र मनसेच्या 100 जागा निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केलाय.

यानंतर मनसे-भाजपची युती होवून शिंदे आणि अजितदादा गटाचं भविष्य अंधातंरी राहिल याकडेही त्यांनी बोट दाखवलंय.मागच्या काही सभांमधून राज ठाकरे भाजपवर का टीका करत नव्हते, त्याचंही उत्तर आजच्या मनसेच्या भूमिकेतून मिळालंय. शिवसेनेनंतर भाजपशी सर्वाधिक संबंध आल्याचं म्हणत राज ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली. राज ठाकरे म्हणाले की., महाविकास आघाडीसोबत आम्ही जाणार नाहीत. शिवसेनेत असताना माझा सर्वाधिक संबंध भाजपशीच आला. सरकार महायुतीचं बनणार, 3 महिन्यापूर्वी मविआचं सरकार येणार असं वाटत होतं. पण हरियाणाच्या निकालानंतर थोडं चित्र बदललं आहे, मात्र महायुतीला इतकं सोपंही नाही.

मुख्यमंत्री भाजपचा होईल, आणि मनसे सत्तेत असेल. भाजपचा मुख्यमंत्री मनसेच्या साथीनं होईल. महाराष्ट्रातल्या राजकीय चिखलाला शरद पवार जबाबदार आहेत. लोकसभेत शिंदेंनी मनसेला धनुष्यबाणावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी शिंदेंसारखा पक्ष किंवा चिन्ह ढापलेला नाही, त्यामुळे नकार दिला. फोडाफोडी करुन सत्तेत जाणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवायला हवा.एकीकडे राज ठाकरे पक्ष फोडाफोडी करुन सत्तेत जाणाऱ्यांना धडा शिकवण्याचं आवाहन करतायत., पक्ष फोडाफोडीवरुन विरोधक भाजपवर आरोप करत असताना राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे मात्र शिवसेना फुटीमागे भाजपचा जबाबदार मानत नाहीत. उलट भाजप आणि भाजपातले अनेक नेते हे नैतिकता पाळणारे असल्याचं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपसोबत सत्तेत जाण्याचा दावा करणाऱ्या मनसेनंच भाजपच्या अनेक धोरणांवर आसूड का ओढले, या प्रश्नावर लोकांनी मनसेला स्वबळावर सत्ता द्यावी., असं अमित ठाकरे म्हणतात.