माजी खासदार जयवंतराव आवळे आणि स्वर्गीय किसनराव आवळे या दोन घराण्यातील राजकीय वैर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजूबाबा आवळे आणि राजीव आवळे या दोघा मुलांनी संपवून हातात हात घातला. या निमित्ताने हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील चित्र बदलले असून महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे यांना बळ मिळाले आहे. माजी खासदार जयवंतराव आवळे आणि स्वर्गीय किसनराव आवळे या दोन घराण्यातील राजकीय वैर इचलकरंजीसह कोल्हापूर जिल्ह्याला परिचित आहे. दोघांनीही वेळोवेळी आपली ताकद दाखवून दिली आहे.
जयवंतराव आवळे यांना हातकणंगलेमध्ये उमेदवारी मिळाल्यानंतर स्वर्गीय किसनराव आवळे यांनी तेथे जाऊन निवडणूक लढवली. या निवडणुकीत जयवंतराव यांचा विजय झाला, तरीसुध्दा त्यांना मोठी धडपड करावी लागली. ज्या-ज्यावेळी संधी मिळेल, त्या – त्यावेळी दोघांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. आपला राजकीय विरोध कायम ठेवला. राजीव आवळे यांना इचलकरंजीचे नगराध्यक्ष पद भूषवण्याची संधी मिळाली. त्यानंतर संजय आवळे यांनाही नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्यानंतर राजीव आवळे यांनी हातकणंगले मतदारसंघातून जयवंतराव आवळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयी झाले. त्यानंतर त्यांना यश आले नाही.
जयवंतराव आवळे त्याच्यानंतर राजू बाबा यांना हातकलंगेच्या जनतेने काँग्रेसच्या हात चिन्हावर आमदार केले महाविकास आघाडीमध्ये आपले स्पर्धक असणारे माहीत असतानाही राजू आवळे यांनी महाविकास आघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदार राजू बाबांना उमेदवारी मिळाली हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहे दोघांना आता एकत्र काम करून आवळे कुटुंबाचे वर्चस्वय पुन्हा एकदा हातकणंगले विधानसभा मतदारसंघात निर्माण करण्याबरोबरच जनतेची कामे अविरत करण्याचा निर्णय घेतला आहे