खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून कुंभोज येथे 95 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ

सध्या अनेक भागांमध्ये विकास कामांचा धडाका सुरू आहे. रस्ते, पाणी, वाहतूक अशा अनेक समस्यांवर उपाययोजना करण्यास सुरुवात झालेली आहे. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून 95 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे संपन्न झाला. या निधीमध्ये मराठा समाज मंदिर तीस लाख रुपये, छत्रपती शिवाजी महाराज नगर अंतर्गत रस्ते दहा लाख, बाबू जमाल रस्ता सुधारणा तीस लाख, मेघराजा ते दानोळी रस्ता पंधरा लाख, छत्रपती शाहूनगर अंतर्गत रस्ते सुधारणा दहा लाख अशा विकास कामांचा समावेश आहे. सदर विकास कामांचा शुभारंभ हा खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे नियोजन मराठा समाज फाउंडेशन व ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने करण्यात आले होते.