विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सांगोला तालुक्यात राजकीय घडामोडी वेगाने सुरु झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमिंगला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत आहेत. सांगोला तालुक्यातील भाजपचे भा.ज.यु.मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अनिल होळकर यांनी पदाचा राजीनामा देत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून शिवसेनेची मशाल हाती घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिपक आबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेत इनकमिंगला सुरुवात झाली आहे. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी तालुक्यातील हजारो तरुण इच्छुक असून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहाजीबापू पाटील गटासह शेकापला भगदाड पडले असून दररोज पक्षप्रवेशासाठी कार्यकर्त्यांची रांग लागली आहे.
शहाजीबापू पाटील गटासह शेकापचे कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करत असताना आता भाजपला देखील मोठा धक्का बसला आहे. सांगोला तालुक्यातील भा.ज.यु.मोचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल होळकर यांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा दिला असून त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मशाल हाती घेतली. शहाजीबापू पाटील गट, शेकापसह भाजपमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने, अंतर्गत गटबाजीला कंटाळून तसेच पक्षांतर्गत बंडाळी उफाळून आल्याने कार्यकर्त्यांनी शिवसेनेची मशाल हाती घेत दिपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिकाने विजयी करण्याचा निर्धार केला आहे.
भा.ज.यु.मोचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल होळकर, करण होळकर, नितीन होळकर, बबन होळकर, संतोष होळकर, संतोष किसन होळकर, बाळासाहेब होळकर, लोणारी समाजाचे तालुका संपर्कप्रमुख विक्रम घेरडे, प्रसाद होळकर, गजेंद्र घेरडे, दीपक आटपाडकर, माणिक होळकर, गणेश करांडे, सुनील मलमे, सुनील तुकाराम मलमे, नितीन घेरडे, भारत ढाळे, विजय घेरडे, रामहरी घेरडे, हर्ष मंडले, तुकाराम घेरडे, पांडुरंग घेरडे (बुवा), गुंडा गरांडे, नानासाहेब घेरडे, किसन होळकर जिगर साबळे, सुनील सुखदेव घेरडे, सुरेंद्र दुधाळ, संतोष नरळे, सागर ढाळे, अनिकेत मंडले, सूर्योदय मंडले, रोहन कांबळे, संकेत मंडले, शिवम शिंदे, यशवंत हातेकर, विजय घेरडे, रंगनाथ हातेकर, साईराज नरळे, ओम नरळे, नामदेव नरळे, हर्षद होळकर, भारत सांगोलकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. कोळा गटातून दिपकआबा साळुंखे पाटील विक्रमी मताधिक्य देण्यासाठी रात्रंदिवस काम करणार असल्याचे अनिल होळकर यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथभाऊ अभंगराव, तानाजीकाका पाटील, जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, युवा नेते यशराजे साळुंखे पाटील, अनिलनाना खटकाळे, योगेश खटकाळे, जुबेर मुजावर, पै.हरी सरगर, विलास होनमाने, डॉ.राज मिसाळ, विनायक मिसाळ, तुषार इंगळे, शिवाजीराव जावीर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून अनेकजण देव पाण्यात घालून बसले होते. पण माझी उमेदवारी जनतेने जाहीर केली आहे. मी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मी आबांकडे जावे आणि आबांच्या पक्षात प्रवेश करावा असे प्रत्येकाला प्रवेश करावा वाटत आहे. शेतकरी कामगार पक्षाला कंटाळून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देण्यात येईल. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष प्रवेशाची रांग लागली आहे.