मा. आम. दिपकआबांची जवळा येथील विद्यार्थ्यांच्या आनंदी बाजाराला भेट! खरेदी केल्या पाले भाज्या

जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा जवळा शाळेतील मुलांचा आनंदी बाजार भरवण्यात आला होता. या आनंदी बाजारामध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या आनंदी बाजारात विविध प्रकारच्या रान भाज्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. वस्तूंचे विद्यार्थ्यांनी स्टॉल देखील लावले होते. या आनंदी बाजाराचा तू एकच की विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढवणे, विद्यार्थ्यांना नफा तोटा चे ज्ञान होणे, खरेदी- विक्री, संवाद कौशल्य वाढवणे, गणितीय आकडेमोड समजणे, मुलांची बुद्धिमत्ता वाढवणे हा एकमेव उद्देश आनंदी बाजाराचा असतो. असे ही शिक्षक सांगतात.

भाजी घ्या भाजी… ताजी ताजी भाजी… भाजी घ्या भेळ घ्या भेळ… मावशी बोरं घेऊन जा…” अशा चिमुकल्यांच्या संवादाने जवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आवार म्हणजेच चावडी कट्ट्या जवळ गजबजून गेले होते. यावेळी गावातील नागरिकांनी भाजी खरेदी करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळे चे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थितीत होते.

. यामध्ये या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा आणि त्यांच्या केलेल्या कार्याला चालना मिळावी आणि त्यांच्यावर कौतुकाची थाप पडावी म्हणून शिवसेना नेते मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या आनंदी बाजाराला भेट देऊन पाले भाज्या खरेदी केल्या. आणि शेतकरी पुत्र विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या. यासह शाळेचेही कौतुक केले.