सांगोला मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बरीच ताणाताणी झाली. शेकापचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ सोडण्यास शिवसेनेच्या ठाकरे गटानं नकार दिला. अखेर शिवसेनेनं ( ठाकरे गट ) येथून दीपकआबा साळुंखे यांना तिकीट दिलं.साळुंखेंनी मंगळवारी ( 5 नोव्हेंबर ) प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी साळुंखेंनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर तोफ डागली आहे.
महाविकास आघाडीत ठाकरे गटानं सांगोल्यावर दावा केल्यानं शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे शहाजीबापू पाटील विरुद्ध दीपकआबा साळुंखे विरुद्ध बाबासाहेब देशमुख, अशी तिरंगी लढत होत आहे. 2019 मध्ये दीपकआबा साळुंखे यांनी शहाजीबापू पाटील यांना निवडून येण्यासाठी मदत केली होती. पण, यंदा साळुंखे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं चूरस वाढली आहे.यातच दीपकआबांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ सांगोल्याचे ग्रामदैवत अंबिका माता मंदिरात श्रीफळ वाढवून केला. यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ), शिवसेनेचे ( ठाकरे गट ) पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तेव्हा, संबोधित कार्यकर्त्यांना संबोधित करताना दीपकआबांनी शहाजीबापूंवर निशाणा साधला.