गुन्हा करण्याच्या तयारीत असणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

हातामध्ये लोखंडी काटावणी घेऊन अंधारात गुन्हा करण्याच्या तयारीत असणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. ही घटना २० सप्टेंबर रोजी रात्री १०. २० च्या सुमारास चिंचोली रोड , सांगोला येथे घडली .

याबाबत पोलिसांकडून मिळालेली हकीकत अशी, शनिवारी रात्री १०. २० च्या सुमारास यातील आरोपी सुरज अशोक लोखंडे (२०, रा. पळशी , (मांगवाडा ), ता. पंढरपूर ,जि . सोलापूर ) हा वंदे मातरम चौक ते चिंचोली जाणाऱ्या रोडच्या बाजूला सुपर मार्केट जवळील दुकानाचे शटरजवळ येथे गुन्ह करण्याच्या हेतूने लोखंडी काटावणीसह अंधारात अस्तित्व लपवून थांबला होता. यावेळी त्यांचेकडे चौकशी केली असता त्या ठिकाणी थांबणेबाबत समाधान कारक उत्तर देत मिळाले नाही . याबाबत पो. काँ . अमर पाटील यांनी सरकारतर्फे त्याचेविरुद्ध फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोहेकॉ काझी करीत आहेत.