भारताचा टेस्ट कॅप्टन फिक्स, रोहितच्या अनुपस्थितीत हा खेळाडू….

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका (बॉर्डर गावसकर ट्रॉफी) खेळणार आहे. टीम इंडियाची पहिली तुकडी या दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. तर दुसरी तुकडी ही सोमवारी 11 नोव्हेंबरला रवाना होणार आहे. त्याआधी भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेद्वारे अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. तसेच नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत भारताची कॅप्टन्सी कोण करणार? त्याबाबतही सांगितलं

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे पर्थ येथे होणाऱ्या सलामीच्या सामन्यात खेळणार नसल्याचं म्हटलसं जात आहे. मात्र याबाबत रोहितने कोणतीही माहिती दिली नाही. तसेच गंभीरनेही रोहित पहिला सामना खेळणार की नाही? याबाबत स्पष्ट काहीच सांगितलं नाही. मात्र गंभीरने रोहितच्या अनुपस्थितीत कॅप्टन कोण असणार? हे सांगितलं. तसेच रोहितच्या जागी कुणाला संधी देणार? हे देखील स्पष्ट केलं.

रोहितच्या अनुपस्थितीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कर्णधार असेल, असं गंभीरने स्पष्ट केलं. तसेच रोहितच्या जागी केएल राहुल आणि अभिमन्यू इश्वरन या दोघांपैकी कुणा एकाची निवड केली जाईल, असंही गंभीरने सांगितलं. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या दुसऱ्या अनऑफीशियल टेस्टमधील दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करणाऱ्या ध्रुव जुरेलचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट झालं आहे.