सध्याच्या काळात डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी यूपीआयचा वापर केला जातो. आजच्या काळात कॅश खूप कमी लोक वापरतात. अगदी 10-20 रुपये देण्यापासून तर लाखो रुपये ट्रान्सफर करण्यासाठी यूपीआयचा वापर केला जातो.आता यूपीआय यूझर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आरबीआयने एक मोठी घोषणा केली आहे.
आरबीआय गव्हर्नरने यूपीआयच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पॉलिसीनंतर सांगितले की, UPI द्वारे पेमेंटची लिमिट 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. पण याची महत्त्वाची अट म्हणजे ही ट्रांझेक्शन फक्त शैक्षणिक संस्थांसाठी वापरता येईल किंवा हॉस्पिटलमध्ये वापरता येईल.
सध्याची लिमिट काय?
NPCI ने सध्या UPI पेमेंटसाठी लिमिट सेट केली आहे. NPCI म्हणते की प्रत्येक यूझर UPI द्वारे एका दिवसात फक्त 1 लाख रुपये देऊ शकतो. तुम्ही यापेक्षा जास्त पैसे देऊ शकणार नाही. जे लोक दररोज 100 किंवा 200 रुपये भरतात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, परंतु जे एका दिवसात जास्त व्यवहार करतात आणि तेही UPI द्वारे करतात, त्यांच्यासाठी खूप त्रास होऊ शकतो.आता प्रत्येक अॅपद्वारे एका दिवसात किती रकमेचा व्यवहार केला जाऊ शकतो हे तुम्हाला माहिती असेल.
तुम्ही GPay वापरत असल्यास, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही एका दिवसात UPI द्वारे फक्त 1 लाख रुपये पाठवू शकाल. तुम्ही यापेक्षा जास्त पैसे देऊ शकणार नाही. तुम्ही एका दिवसात कितीही वेळा पैसे भरा. पण ती एकूण रक्कम ही 1 लाखांपर्यंतच असायला हवी.NPCI नुसार, पेटीएम येथून देखील तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंत पाठवू शकाल. पेटीएम एका तासात 20,000 रुपयांपर्यंत व्यवहार करू देते.
दर तासाला किमान 5 व्यवहार आणि जास्तीत जास्त 20 व्यवहारांना परवानगी आहे. PhonePe यूझर्स एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करण्याची परवानगी देते. ती व्यक्ती ज्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करत आहे त्यावरही अवलंबून असते.