सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! नवीन वर्षात होणार पगार वाढ

बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. नवीन वर्षात बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. 7 डिसेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार, इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि इतर बँक युनियन्समध्ये पगार सुधारणांवर एकमत झाले आहे.2021-22 या आर्थिक वर्षापासून 5 वर्षांसाठी पगारात 17 टक्के वार्षिक वाढ करण्यावर एकमत झाले आहे.

पगारातील ही वाढ 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू होणार आहे. मात्र, पगार करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी शनिवारी बँकांना सार्वजनिक सुटी जाहीर करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे. 5 दिवसांच्या कामकाजाबाबत लवकरच निर्णय याचा अर्थ असा की द्विपक्षीय करारासाठी IBA आणि युनायटेड फोरम ऑफ बँक्स आणि इतर युनियन आणि संघटना यांच्यात सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे. मात्र, पाच दिवसांच्या कामकाजाचा निर्णय जाहीर झाल्यावरच युनियन अंतिम करारावर स्वाक्षरी करतील.अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेत आयबीएकडून प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे.

मात्र, अर्थ मंत्रालयाने या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे की नाही हे त्यांनी सांगितले नाही. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि इतर बँक युनियन यांच्यात 7 डिसेंबर रोजी झालेल्या पगारवाढीच्या निर्णयानुसार, पगार आणि भत्त्यांसह सरासरी 17 टक्के वाढ होणार आहे. आणि नवीन वेतनश्रेणी 5 वर्षांसाठी लागू असेल.

या वाढीमुळे अंदाजे 12449 कोटी रुपये खर्च होणार आहे. नवीन वर्षात घोषणा होऊ शकतेअलिकडच्या काही वर्षांत बँकांच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाल्याचे कर्मचारी आणि संघटनांचे म्हणणे आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता निवडणुकीपूर्वी वेतन करार होणे अपेक्षित आहे. बँक कर्मचारी हा महत्त्वाचा मतदार आधार आहे.