राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा आणि गाठीभेटींचा धडाकाच सुरू केला आहे.त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगही जोमाने कामाला लागले असून भरारी पथके, स्थिर पथके, पोलीस यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जनजागृती करत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, इस्लामपूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र, तुजारपूर, मसूचीवाडी, साटपेवाडी, तसेच मिरज तालुक्यातील दुधगाव येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षात योग्य मान सन्मान ठेवला जाईल, असा विश्वास आ. जयंतराव पाटील यांनी यावेळी दिला.
येडेमच्छिंद्र येथील माजी उपसरपंच संभाजी मानकर, सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्रनाथ कांबळे, महेश कांबळे, मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते अल्लाउद्दीन नदाफ, उदय कदम, गणेश कांबळे, रमेश सावंत, तसेच कृष्णा पाणी पुरवठ्याचे संचालक राजेंद्र पाटील, यशवंत पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य आबासो चव्हाण, अक्षय पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
तुजारपूर येथील प्रविण बाबर, सचिन बाबर, अनिल निकम, श्रीकांत पाटील, धोंडीराम शेळके, मसूचीवाडी येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी अभिजीत माने, सुशांत पवार, अजित कदम, थोडिराम कदम, विशाल कदम, प्रशांत माने, साहिल शेळके या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. साटपेवाडीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सच्चिदानंद साटपे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दुधगाव येथील निखिल आडमुठे, अमोल खोचीकार, मुकुंद गवळी, श्रेणिक पाटील यांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.