16 ऑगस्टपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

ग्रामपंचायत (Gram Panchayat) हे ग्रामीण भागातील विकास आणि सामाजिक सुरक्षेचं मुख्य केंद्र असते. हा गावगाडा पुढे नेण्याचं काम गावचा सरपंच करत असतो. मात्र, ग्रामपंचायतीचा कारभार करत असताना त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.या अडचणी सोडवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून अखिल भारतीय संरपंच परिषद शासन दरबारी लढा देत आहे.

मात्र, सरकारचं ग्रामपंचायतीच्या संदर्भातील विविध मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं विविध मागण्यांसाठी येत्या 16 ऑगस्टपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन होणार आहे.या कामबंद आंदोलनात सरपंच (Sarpanch), उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांचा समावेश आहे.

28 ऑगस्टपर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय संरपंच परिषदचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली. पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे.