कटफळ येथील युवा कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगोला तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे.

कटफळ येथील युवा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेतली. दररोज शेकडो कार्यकर्ते दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने सांगोला तालुक्यात शिवसेनेचे मजबूत संघटन निर्माण झाले असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघावर उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा फडकवणारच असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

कटफळ ता.सांगोला येथील साहिल धनवडे, राहुल सावंत, किशोर धनवडे, सम्राट धनवडे, हर्षद सावंत, ओमप्रकाश लोखंडे, लखन धांडोरे, किरण सावंत, सूरज धांडोरे, सुदेश धनवडे, रोहन सावंत, समाधान धांडोरे, ज्ञानेश्वर धांडोरे, आकाश वाघमारे, सिद्धेश सावंत, समाधान धांडोरे, राजेश हातेकर, वैभव धांडोरे, आदिराज वाघमारे, सागर सावंत, प्रवीण सावंत, सोमनाथ लांडगे, नवनाथ लांडगे, ऋषिकेश धांडोरे यांनी दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी इमरान काझी, राहुल होवाळ, रोहन होवाळ, धैर्यशील सुरवसे, शुभम जुंदळे, परशुराम भोसले, तानाजी हेगडे, नितीन होव्हाळ उपस्थित होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजय करण्याची ग्वाही दिली.