सांगलीतील कवलापूर येथे लवकरच विमानतळ (Kavalapur Airport) उभारण्यात येईल आणि तेथून दिल्ली, बंगळूर, चेन्नई, मुंबई विमानसेवा सुरू होईल. हळद बोर्डाची मजबूत शाखाही सांगलीत उभारू आणि मोठा प्रकल्पही सांगलीला देऊ, अशी ग्वाही भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिली.
येथे सांगलीचे महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil), मिरजेचे उमेदवार सुरेश खाडे आणि तासगाव कवठेमहांकाळचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे आयोजन केले होते. सभेच्या निमित्ताने भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.