गार्डी येथील कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगोला विधानसभा मतदारसंघातील गार्डी येथील कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आपल्यावर व आपल्या पक्षावर जो विश्वास या कार्यकर्त्यांनी दाखविला, त्याबद्दल विशेष ऋण व्यक्त करीत तालुक्याचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहे.

या भागातील विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही प्रवेशकर्ते व ग्रामस्थांना दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यानंतर तालुक्यातील हजारो कार्यकर्ते दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत.

दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी उत्सुक असल्याने दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याने शिवसेनेचे मजबूत संघटन निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत मशाल हाती घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

दिपकआबांनी या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत. यापुढील काळातही ते विकासकामांना प्राधान्य देतील, त्यासाठी आम्ही त्यांना विधानसभा निवडणूक सहकार्य करू, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी गार्डी ता.पंढरपूर येथील भारत अडगळे, अमोल अडगळे, आकाश अडगळे, अमित अडगळे, निखिल साठे, आकाश आवळे, सोनू अडगळे, राहुल अडगळे, तुषार खंडागळे, सूरज अडगळे, नाथा देवकुळे, रोहित हिंगमिरे, महेश आवळे या कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मशाल हाती घेतली.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, साईनाथ अभंगराव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, अजित देवकते, अवि देशमुख, मोहसीन तांबोळी, आर. डी.पवार, भारत कोळेकर, मधुकर हाके, दशरथ थोरात, दत्तात्रय थोरात, तानाजीराव गोफने, अर्जुन खरात, दत्तात्रय पाटील, लक्ष्मण थोरात, धोंडीबा थोरात, बाळासाहेब कोळेकर, संतोष गायकवाड, तानाजी गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.