दिपकआबांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार! हर्षवर्धन पाटील मित्र परिवाराचा दिपकआबांना पाठिंबा

महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडे तरुणांचा कल वाढला असून दररोज शेकडो तरुण शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेत आहेत. हर्षवर्धन पाटील मित्र परिवाराच्या वतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विक्रमी मताधिक्यांनी विजय करण्याचा निर्धार केला. दिपकआबा साळुंखे पाटील यांना तरुणांचा पाठिंबा वाढत असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

हर्षवर्धन पाटील मित्र परिवाराने दिपकआबांच्या उपस्थितीत प्रवेश करून मशाल घेतली. हर्षवर्धन पाटील, माऊली लोहकरे, आदेश बागल, अभिषेक खाडे, महेश चव्हाण, निलेश बचुटे, यशराज जगताप, आदित्य जाधव, विशाल डोके, सॅम शिवशरण, ओंकार पवार, प्रतीक पवार, विकी सावंत, दिनेश खाडे, अजित खडतरे, संतोष खडतरे, जयसिंग पाटील या हर्षवर्धन पाटील मित्र परिवाराने दिपकआबांना पाठिंबा दिला.

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज असल्याने तसेच सर्वसामान्य गोरगरिबांचे, वंचित, अपेक्षित घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही दिपकआबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे हर्षवर्धन पाटील मित्र परिवाराने सांगितले.