नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये महायुतीला बहुमत मिळाले. आता महापालिका निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. इच्छुकांनी आतापासूनच तयारीला सुरुवात देखील केल्याचे चित्र दिसत आहे. खा. धैर्यशील माने यांच्या प्रयत्नाने इचलकरंजी नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले. यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे. यंदा प्रथमच महापालिकेची पहिली निवडणुक होत आहे.. त्यामुळे पहिल्या सभागृहात पाऊल ठेवण्यासाठी अनेकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
