शिंदे सरकार राहणार की जाणार? विधानसभा निवडणुकीच्या ताज्या सर्व्हेत काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर राज्यातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी सी-व्होटरचा सर्व्हे समोर आला आहे. या पाहणीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रिया वाढली असल्याचे समोर आले आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांची लोकप्रिया वाढली असताना जनता सरकारच्या कामावर नाराज असल्याचे दिसत आहे. परंतु लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार असल्याचे म्हटले आहे.

सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये 51% लोक शिंदे सरकारच्या कामावर नाराज आहे. त्यांना बदल हवा आहे. परंतु 41% जनता सरकारवर समाधानी आहे. शिंदे सरकारसाठी जास्त टक्के लोक नाराज असणे हा अडचणीचा मुद्दा ठरु शकतो. परंतु यानंतर शिंदे सरकारला दिलासा देणारी बाब आहे. ती म्हणजे 52 लोक महायुती सरकारने विकासाची कामे चांगली केल्याचे म्हटले आहे. 21 टक्के लोकांनी सरकारचे काम सरासरी असल्याचे म्हटले आहे. 23 टक्के लोकांनी सरकारचे काम खराब असल्याचे म्हटले आहे. 51 टक्के लोकांनी विद्यामान आमदारांना पुन्हा संधी देण्याचे म्हटले आहे. परंतु 30 टक्के लोकांना बदल हवा आहे.

महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात लढत सर्व्हेतून दिसत आहे. 27.5 लोकांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यास संमती दिली आहे. 23 लोकांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवे आहे. 11 टक्के लोकांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. शरद पवार यांना 6 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. अजित पवार यांना 3 लोकांनी पसंती दिली आहे. सर्व्हेतून देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रियता कमी झाल्याचे दिसत आहे. कधीकाळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पहिल्या क्रमांकावर होते. परंतु आता एकनाथ शिंदे पहिल्या क्रमांकावर आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांची ‘लाडकी बहीण योजना’ चा मोठा परिणाम लोकांवर दिसत आहे. या योजनेबाबत 45 टक्के लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे निवडणुकीत ही योजना ‘गेम चेंजर’ ठरु शकतो. मराठा आरक्षण मुद्याचा परिणाम निवडणुकीवर होणार आहे.