राज्यात चक्रीवादळाचा परिणाम ; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे दबाव वाढला असून राज्यातील हवामानावर त्याचा परिणाम होत आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होताना दिसत आहे. पहाटे, सायंकाळी आणि रात्री गारठा असला तरीही दुपारी मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे.

चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्याहवामानावर होताना दिसत आहे. आज (१७ नोव्हेंबर) रोजी राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. चक्रीवादळाचा परिणाम म्हणून येत्या तीन ते चार दिवसात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.