इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथील थोरात चौकात झालेल्या विजयनिर्धार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यंत्रमागधारकांना विजेच्या बिलांच्या समस्ये मधून कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी इचलकरंजी वस्त्रनगरीला सोलर सिटी बनवून अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच इचलकरंजी शहराला मंजूर असलेली सुळकुड पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपण पुढाकार घेऊ तसेच यंत्रमाग कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना करू अशी ग्वाही त्यांनी दिली. पुढे ते म्हणाले नेहमीच्या मंडळीने हिंदू धर्माला विरोध केला तीच मंडळी आता ‘राम कृष्ण हरी’ म्हणू लागले आहेत. तेव्हा भगव्याची काय जादू आहे ही दिसत आहे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सहकार रुजवला आहे. आणि तो सहकार वाढवण्याचे काम आवाडे यांची नवीन पिढी राहुल आवाडे करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेला विक्रमी गर्दी झाली होती. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता जमलेल्या मोठ्या जनसमुदायाला सभा पाहण्यासाठी सभासदारी ठिकठिकाणी स्क्रीनची सोय करण्यात आली होती. एकीकडे महायुती सरकार विकास सर्वांना एकत्र करण्याचे काम सुरू केले असताना दुसरीकडे महाविकास आघाडीने काही लोकांचे पाय टाचण्याचे काम सुरू केले, यामध्ये वोट जिहाद करण्या साठी प्रयत्न सुरू केले. तेव्हा मताचे धर्मयुद्ध करण्यासाठी तुम्हाला जागे करण्यासाठी आलो असून यावेळी आपण पेटून उठलो नाही तर कदापि जिंकणार नाही तेव्हा राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी सर्वांनी निर्धार करा असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. आमदार प्रकाश आवाडे यांनी देशातील विकेंदरीत क्षेत्रातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील सर्वात मोठी शहर म्हणून इचलकरंजी ओळख आहे. दिवसेंदिवस शहर परिसराची औद्योगिक वाढ होत चालली आहे. वस्त्रोद्योगाची ही वाढ कायम ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे ना विजय करा असे आव्हान त्यांनी केले.