महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांचे प्रचारार्थ कामगार मेळावा संपन्न झाला. सदर मेळाव्याचे अध्यक्षस्थानी जेष्ठ भाजपा नेते मिश्रीलाल जाजू हे होते. यावेळी बोलताना मिश्रीलाल जाजू म्हणाले की, इचलकरंजी शहर आणि परिसरात सत्तर टक्के कामगार आहेत. कामगार जो ठरवतील तोच आमदार होणार आहे. इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील कामगारांनी यावेळी राहुल आवाडे यांनाच आमदार करण्याचा निर्धार केला आहे. महायुती सरकारने सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या हिताच्या अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. यावेळी बोलताना माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये देशाची चौफेर प्रगती केली आहे. भारताची मान जगात उंचावली आहे. आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकाची आहे.
नजिकच्या काळात ती जगात तिसऱ्या क्रमांकावर जाईल या दिशेने वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्य नागरीकांना योजनेचे लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे विरोधक मोदीवर सातत्याने खोटी टीका करत आहेत. यावेळी बोलताना संघटनेचे सरचिटणीस मदन मुरगूडे म्हणाले की, युती सरकारने बांधकाम कामगारांकरीता अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष अमृतमामा भोसले, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अनिल डाळ्या, आनंदराव साने, पूनम जाधव, माजी नगरसेवक सुनिल साळुंखे, संजय गेजगे यांची भाषणे झाली. यावेळी परशराम कत्ती, पांडुरंग पांढरपट्टे, ताजुद्दीन शेख, वर्षा कांबळे, सुरेखा पाटील, रेखा कोंडीकीरे, सुजाता माने, साक्षी काने, सुजाता वसवाडे, बबन सुतार, संजय कोरे, संदिप मांगलेकर, सुरेश मदने, गीता कोरे, सुजाता पांढरपट्टे, केशव गुरव, रमेश गच्छी, वसंत कवळीकट्टी यांचेसह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील महिला व पुरूष कामगार उपस्थित होते.