काल विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात चुरशीने ७४ टक्के मतदान झाले. 2 लाख 80 हजार 856 मतदारांपैकी 2 लाख 60 हजार 833 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 12 उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले आहे. शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंतराव पाटील हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बोरगाव, ता. वाळवा येथील वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादलाचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांनी शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये पहाटे अभिषेक करून गावातील सर्व मंदिरामध्ये दर्शन घेतले. यानंतर जाधव यांनी मतदान केंद्रावर जात मतदान केले.