ग्रहस्थितीचा मानवी जीवनाशी कार्यकारणसंबंध वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला नाही. त्या कार्यकारण संबंधावर ज्योतिषशास्त्र आधारित नाही त्यामुळे ते फसवे असून कुंडली काढणारे व राशीचे खडे देणारे लोकांची फसवणूक करतात. तो त्यांचा मार्केटिंग फंडा आहे. लग्न ठरविताना ३६ गुण जुळविणे हा प्रकार वर्ण जाती व्यवस्थेला खतपाणी घालतो. त्यामुळे तरुणांनी त्याच्या होळ्या कराव्यात, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. नितीन शिंदे यांनी केले. मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयात आयोजित वैज्ञानिक जागीय एकदिवशीय कार्यशाळेत ते बोलत होते.
डॉ. शिंदे म्हणाले, गुरुपुष्यामृत योगाचा आणि सोनं खरेदी हा श्रद्धेचा बाजार आहे. राशीचे खडे हा शुद्ध फसवेगिरी आहे. राशीचे खडे भविष्य घडवत नाहीत. आकाशातील गृह तारे नक्षत्रावरून ते खडे आणलेले नसतात. पृथ्वीवरीलच असतात. कोट्यवधी मैलावरील मंगळ, गुरू, शनी आपल्यावर प्रभाव पाडत नाहीत. त्यांच्या नावाने केले जाणारा धंदा हा श्रद्धेचा बाजार आहे. वास्तुशास्त्र एक फसवेगिरी आहे. नागवली विधी म्हणजे शुद्ध आर्थिक फसवणूक आहे सिंहस्थ पर्वणीला बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा म्हणजे पैशांची उदयपट्टी आहे तेच हजारो कोटी रुपये शासनाने शेतीच्या विकासासाठी वापरावेत लग्न जुळवताना ग्रहांची दशा पाहण्याऐवजी शिक्षण आरोग्य पाहून ती जुळवावीत.
