आटपाडीत उमेदवाराला धमकी…… 

खानापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संतोष सुखदेव हेगडे (वय ३०, रा. आवळाई) यांनी दिघंची येथील  भाषणात केलेल्या टीकेनंतर एका कार्यकर्त्याने त्यांना फोनवरून शिवीगाळ करून धमकी दिली. याबाबत हेगडे यांनी संशयित संजय हाके (पूर्ण नाव नाही.) याच्याविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.