सांगोला विधानसभा निवडणुकीत कर्तव्याच्या ठिकाणी हजर न राहिल्याने शिक्षकावर गुन्हा……

सांगोला विधानसभा निवडणुकीत कर्तव्याच्या ठिकाणी हजर न राहता शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार्शीतील सुलाखे हायस्कूलचे सहशिक्षक यांच्या विरुद्ध सांगोला पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत सोमनाथ सदाशिव साळुंखे (रा. कुंभार गल्ली, सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वैभव भास्कर कदम (रा. बेलेश्वर नाका, सुलाखे हायस्कूल, बार्शी, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे सहलोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ चे कलम १३४ प्रमाणे दखलपात्र गुन्हा केला आहे.

सांगोला विधानसभा निवडणूक कामाकरिता प्रथम मतदान अधिकारी (राखीव) वैभव भास्कर कदम (सहशिक्षक सुलाखे हायस्कूल, बार्शी) यांना विधानसभा २०२४ चे कामकाजाकरिता सांगोला विधानसभा २५३, बूथ क्रमांक ४१ जुनी लोटेवाडी या ठिकाणी नेमले होते.

क्षेत्रीय अधिकारी एस. एम. म्हेत्रे यांनी त्यांना वारंवार फोन केला असता, त्यांचा फोन बंद होता. त्याबाबत सहशिक्षक वैभव कदम यांच्याविरुद्ध लेखी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांना दिला होता. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केल्याचे सांगितले.