पंढरपूर-मंगळवेढ्यातील मतदार समाधान आवताडे यांना आणखी एक संधी देण्याची शक्यता? मतविभाजनाचा फटका सावंत व भालकेंना बसणार का?

निवडणुकीचा धुरळा संपल्यानंतर उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. दोन दिवसांमध्ये निकाल लागणार असून तत्पूर्वी चित्र बरेचशे स्पष्ट झाले.मतदारांचा कौल पाहिला तर मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात अटीतटीचा सामना आहे.तरीही मतदार विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना आणखी एक संधी देण्याची शक्यता आहे.

मागील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटलेली नसल्याने या दोन पक्षांच्या बेरजेवर आघाडी आणि युतीने तग धरलेला होता. आता परिस्थिती बदलली आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटल्याने दोन्ही मुळ पक्षांना याचा चांगलाच फटका या निवडणुकांमध्ये बसताना दिसत आहे. मत विभाजनाचा फटका इथे सर्वच राजकीय पक्षांना बसलेला आहे. मंगळवेढा-पंढरपूर मतदारांची संभ्रमावस्था यावरून दिसून येते.महाविकास आघाडीकडून दोन उमेदवार उभे असल्यामुळे यात मतविभाजन झाले असल्याचे बोलले जात आहे.

तर मनसेचे दिलीप धोत्रे यांनी देखील पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोरगरीब जनतेची कामे केल्यामुळे तेथील जनतेचा कौल त्यांना मिळाले का? हे 23 ला समजणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे भगीरथ भालके व राष्ट्रवादीचे अनिल सावंत या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर मत विभागणी झाली आहे का? याचा फटका भगीरथ भालकेंना जर बसला तर समाधान आवताडे हे विजया जवळ जाऊ शकतात असे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.

मराठा समाजाने जरांगे फॅक्टर राबवला असला तर याचा सर्वात जास्त फटका भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना बसेल, त्यामुळे सावंत व भालके यांना अधिकाअधिक मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक राजकीय विश्लेषकांच्या अंदाजाने मतदार समाधान आवताडे यांना पुन्हा एकदा संधी देतील असे सध्य स्थिती पाहता वाटत असल्याचे दिसून येत आहे.