Maharashtra election result: मतमोजणीची यंत्रणा सज्ज, उद्या 8 वाजता सुरू होईल मतमोजणी प्रक्रिया

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. उद्या सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार सर्व तयारी केली आहे.2024 च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढले आहे, जे 2019 च्या निवडणुकीतील 61.1% वरून यावेळी अंदाजे 66% पर्यंत पोहोचले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील भारतात निवडणूक आयोगाने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियांचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. यानुसार अनेक उपक्रम राबविण्यात आले, ज्यांची काटेकोर अंमलबजावणी राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाच्या दिवशी दिसून आली आहे.उद्या सकाळी 8.00 वाजता सर्व मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल. या प्रक्रियेदरम्यान, पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी 8:00 वाजता सुरू होईल, त्यानंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सकाळी 8:30 वाजता सुरू होईल.