केंद्र आणि राज्य सरकार देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहेत. या योजनांचा उद्देश देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हा आहे.हे लक्षात घेऊन 2019 मध्ये भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली.आत्तापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे एकूण 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
तर 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता देण्याची घोषणा केली होती. अशातच देशातील कोट्यवधी शेतकरी आता 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा प्रत्येक हप्ता चार महिन्यांच्या अंतराने जारी केला जातो. 18 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जारी करण्यात आला. त्यामुळे ऑक्टोबरच्या चार महिन्यांनंतर फेब्रुवारी महिना येतो. त्यामुळे या योजनेचा 19 वा हप्ता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.