बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, ‘हाउसफुल 5’ या आगामी सिनेमाच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. यावेळी हाऊसफुलच्या फ्रेंचायझीत फक्त कॉमेडीच नाही तर बड्या अभिनेत्रींचाही तडका पाहायला मिळणार आहे.
हा सिनेमा प्रेक्षकांसाठी खास असणार आहे कारण ‘हाउसफुल’ फ्रेंचायझीचा हा पाचवा भाग आहे.या सिनेमाचे निर्माते या सिनेमाला भव्य स्वरूप देण्यासाठी काहीही कमी ठेवत नसल्याचं सांगण्यात येतंय. सिनेमाचं चित्रीकरण भव्य लोकेशन्सवर केलं जाणार आहे. त्यामुळं हाऊसफुलचा पाचवा भाग प्रेक्षकांसाठी हा एक भन्नाट अनुभव ठरेल. दरम्यान, या चित्रपटात पाचव्या भागात बॉलिवूडच्या लोकप्रीय अभिनेत्री या सिनेमात दिसणार आहेत. कोण कोण असणार हाऊसफूल ५मध्ये?
‘हाऊसफुल 5’ च्या कास्टची घोषणा झाली असून, यावेळी या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, फरदीन खान, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, नरगिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, Chunky पांडे, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, चित्रांगदा सिंग, रंजीत, सौंदर्या शर्मा, निकितिन धीर असे अनेक दिग्गज कलाकार सहभागी आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. कारण ही स्टारकास्ट म्हणजे कॉमेडी आणि ग्लॅमरचा एकाच वेळी धमाका असणार आहे. यावेळी चित्रपटात या सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री असतील, असं बोललं जात आहे. या फ्रेंचायजीच्या आधीच्या चित्रपटांमध्ये नेहमीच मोठ्या स्टार्सचा ताफा दिसत आला आहे, आणि यावेळी त्यावर आणखी एक पाऊल पुढे टाकलं जात असल्याचं दिसतंय.