हातकणंगलेमधून जनसुराज्यच्या अशोकराव माने यांनी काँग्रेसच्या राजू आवळे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे जनसुराज्यला जिल्ह्यात दोन जागा मिळाल्या आहेत. हातकणंगले विधानसभेच्या निवडणुकीवेळी अशोकराव माने यांची उमेदवारी निश्चित झाल्यावर महायुतीमधील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. प्रामुख्याने खा. धैर्यशील माने, जनसुराज्य पक्षाचे आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे, महाडिक गट, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आ. सुरेश हाळवणकर तसेच जि.प.चे माजी सदस्य अरुण इंगवले या नेत्यांची अशोकराव माने यांना मतांची आघाडी देण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागली होती. सर्व नेतेमंडळी एकत्र येऊन अशोकराव माने यांचा प्रामाणिकपणे प्रचार करून त्यांना विजयश्री मिळवून दिली.
