हुपरी येथील जवाहर कारखान्याची निवडणूक बिनविरोध….

हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची २०२४ ते २०२९ या सालाकरिताची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याचे आज स्पष्ट झाले.उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी १९ जागांसाठी १९ अर्ज शिल्लक राहिले आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा येत्या शनिवारी ३० नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता विशेष सभेत केली जाणार आहे.

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही आठवी बिनविरोध निवडणूक आहे. काहीजणांनी किरकोळ नाराजीतून उमेदवारी अर्ज भरले होते; मात्र आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांची नाराजी दूर करण्यात यश मिळवले. त्यामुळे माघारीच्या आज अखेरच्या दिवशी निवडणूक रिंगणात १९ जागांसाठी तेवढेच अर्ज शिल्लक राहिले आहेत.