शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

महाविकास आघाडीकडून सांगोल्याची जागा शेकाप पक्षाला सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडीतून ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली. त्यामुळं बाबासाहेब देशमुख यांनी देखील निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आघाडीत बिघाडी झाल्याने याचा फायदा आमदार शहाजीबापू पाटील यांना होईल अशी चर्चा होती पण जनतेने बाबासाहेब देशमुख यांच्या बाजूने कौल दिला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असले तर काही ज्येष्ठ नेत्यांचा पराभव झाला आहे. काय झाडी का डोंगर या डायलाॅगमुळे राज्यात प्रसिद्ध झालेले शिवसेना शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा शेतकरी कामगार पक्षाच्या डाॅ.बाबासाहेब देशमुख या युवा नेत्याने पराभव केला. निवडणुक जिंकताच देशमुख यांनी एका अनोख्या स्तुत्य उपक्रमाची घोषणा केली आहे, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बाबासाहेब देशमुख यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि जिंकलीही. ज्या गावात मतांचा जितका लीड मिळाला आहे, त्या गावात तितकी झाडे लावण्याच्या उपक्रमाची घोषणा बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे. पर्यावरण रक्षण ही काळाजी गरज असून, झाडे लावा झाले जगवा हा संदेश देण्यासाठी हा नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतल्याचं सांगितलं जात आहे.