अभिनेता शाहरुख खान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे त्रिकूट एका खास प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत. ‘डिअर जिंदगी’, ‘गली बॉय’ आणि ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटांमधील भूमिकांचा संदर्भ घेऊन ही खास जाहिरात शूट करण्यात आली आहे. या जाहिरातीत रणबीर आणि आलियाच्या वैवाहिक आयुष्यावरून भन्नाट विनोद करण्यात आले आहेत. जवळपास एक मिनिटाच्या या जाहिरातीत शाहरुख डॉ. जहांगीर खान भूमिकेत बसून रणबीर आणि आलियाचं काऊन्सिंग करताना दिसतोय.यावेळी शाहरुख विचारतो, बनी, सफीना.. तुमचं वैवाहिक आयुष्य कसं सुरू आहे?
त्यावर सफीनाच्या भूमिकेतील आलिया म्हणते, मी तुम्हाला सांगते, मी त्याला थोडा बर्फ आणायला सांगितला तर तो थेट लडाखला गेला. मी त्याला फोन करून विचारलं की, तुला इतका का वेळ लागतोय? तर तो म्हणाला ‘मी पर्वतांमध्ये रमलोय. यानंतर आलिया तिचा प्रसिद्ध डायलॉग बोलून दाखवते, इतना पहाडों के साथ गुलू गुलू करेगा तो धोपटूईंगी ना इसको. यानंतर रणबीर त्याचा प्रसिद्ध डायलॉग म्हणतो, डॉ. जहांगीर, मै उडना चाहता हूँ, दौडना चाहता हूँ, बस इस घर में रुकना नहीं चाहता. हे ऐकल्यानंतर शाहरुख विचारतो, पण का? रणबीर तक्रार करत म्हणतो, त्यादिवशी मी सूर्यास्त बघायला छतावर चढलो आणि ते छतच मोडलं. मला इथे सुरक्षित वाटत नाही. यावर आलिया म्हणते, तुला घरावर रॉक क्लाइंबिंग कोणी करायला सांगितलं? या दोघांमधील वाद थांबवत शाहरुख सल्ला देतो, मी तुम्हा दोघांचं ऐकून घेतलंय.
माझ्याकडे तुमच्यासाठी एक उपाय आहे… यानंतर शाहरुख ज्या प्रॉडक्टची जाहिरात आहे, त्याबद्दल सांगतो.शाहरुख, आलिया आणि रणबीर यांच्या या जाहिरातीवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांना रणबीर आणि आलियामधील मजेशीर संवाद आवडला आहे. या दोघांच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास, ते संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.