राज्यात 3 डिसेंबरपर्यंत थंडी! 4 डिसेंबरपासून कडाका कमी होणार

बंगालच्या उपसागरातून आलेले फेंजाल नावाचे चक्रीवादळ दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर धडकल्याने अवघ्या देशातील हवामानावर त्याचा परिणाम दिसणार आहे. बाष्पयुक्त वार्‍यांमुळे राज्यात आगामी तीन दिवस म्हणजे 3 डिसेंबरपर्यंत दाट धुके वाढून पारा 3 ते 5 अंशांनी खाली येईल.मात्र 4 डिसेंबरपासून कडाका कमी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.