‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्यांदाच होणार ‘परदेसी गर्ल’ची एन्ट्री!

छोट्या पडद्यावरील मनोरंजनाचा बॉस असलेलाबिग बॉस मराठीचा नवीन सीझन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस प्रेमींना या पर्वाची आतुरता लागली आहे. 28 जुलैपासून बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाला सुरुवात होणार आहे. यंदा बिग बॉस मराठीचा होस्ट अभिनेता रितेश देशमुख असणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात कोण-कोण स्पर्धक म्हणून येणार आहे, याची सर्वांना आतुरता लागली आहे. बिग बॉसच्या घरात एका खास स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्यांदाच एका ‘परदेसी गर्ल’ची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. बिग बॉसच्या घरात एका परदेशी अप्सरेची एन्ट्री होणार आहे. बिग बॉस अधिकृत इंस्टाग्रामवर बिग बॉस मराठीचा नाव प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये एक सुंदरी दिसत आहे. बिग बॉस मराठीमध्ये एका परदेशी अप्सरेची एन्ट्री होणार असल्याचं या प्रोमोमध्ये सांगण्यात आलं आहे. या प्रोमोमुळे बिग बॉसप्रेमींची उत्सुकता आणखी वाढली आहे. या परदेसी गर्लची घरात एन्ट्री किती खास असणार, हे लवकरच पाहायला मिळणार आहे.