हातकणंगले लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष अविनाश बनगे यांना मिळू शकते मोठी संधी….

नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वांच्याच हाती लागला आणि यामध्ये महायुती सरकारने मोठा विजय मिळवलेला आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून डॉ. अशोकराव माने यांनी विजय मिळवला आहे. या विजयात अनेकांचे परिश्रम लागलेले आहे. हातकणंगले लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष अविनाश बनगे यांनी देखील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अतिशय जोमाने काम केलेले होते. हातकणंगले लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष अविनाश बनगे यांना आणखीन एक मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. बनगे खासदार धैर्यशील माने गटाचे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांना कदाचित मागासवर्गीय आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष पद मिळू शकते.