हातकणंगलेत पाटलांचा जोर….

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पाटील आडनाव असणाऱ्या मतदारांची संख्या ही इतर आडनावांच्या मतदारांपेक्षा जास्त आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ३ लाख ३९ हजार तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात २ लाख ६३ हजार ५६३ पाटील आडनावाचे मतदार आहेत.

त्यानंतर कांबळे आडनावाचे मतदार असून, त्यांची संख्या कोल्हापूर मतदारसंघात १ लाख, तर हातकणंगले मतदारसंघात ८२ हजार ४२१ एवढी आहे. त्यानंतर जाधव आडनावाचे मतदार जास्त आहेत. मतांची ही आकडेवारी पाहता दोन्ही मतदारसंघात पाटलांचीच ताकद जास्त दिसते. निवडणुकीच्या मतदार याद्यांचे विश्लेषण केल्यानंतर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पाटील आडनाव असलेल्या मतदारांचा बोलबाला असल्याचे चित्र आहे.

शिरोळ, हातकणंगले, इस्लामपूर वाळवा या मतदारसंघात पाटील आडनावात मराठा व जैन समाजाच्या मतदारांचा समावेश दिसतो. इतर मतदारसंघात मात्र मराठा पाटील यांची संख्या जास्त आहे.…