इचलकरंजीत स्थापन केलेल्या ताराराणी पक्षाचं काय? भाजप वर्तुळाचे लक्ष

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून डॉ. राहुल प्रकाश आवाडे हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांना तिकीट देखील मिळाले.आमदार प्रकाश आवाडे आणि पुत्र डॉ. राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राहुल आवाडे आमदार झाले.

परंतु त्यांनी स्थापन केलेल्या ताराराणी पक्षाचे अस्तित्व अजूनही कायम आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमधून ताराराणी पक्षाचं काय करणार? असा सध्या सवाल उपस्थित केला जात आहे. जर आवाडे परिवार भाजपमध्ये सहभागी झाला असेल तर ताराराणी पक्षाचे अस्तित्व वेगळं का? अशीही विचारणा होत आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे काय निर्णय घेतात याकडे भाजप वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेले आहे.