हातकणंगले मतदारसंघात डॉ. अशोकराव माने यांच्या विजयाने नव्या राजकीय पर्वाची सुरुवात

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वांच्या हाती लागला. या निवडणुकीत महायुतीने प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार मा. अशोकराव माने हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. जनसेवा करत असताना हातकणंगले सारख्या राखीव मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मनोदय ठेवून त्यांनी मागील पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून मा. डॉ. विनयरावजी कोरे (सावकार) यांच्या मार्गदर्शनाखाली जनसुराज्य शक्ती पक्षाकडून निवडणूक लढवली.

थोड्या मताच्या फरकाने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. तरीही हार न मानता त्यांनी पाच वर्षे सतत मतदारसंघात आपला संपर्क ठेवून मतदारापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवल्या. या काळात कोणतेही राजकीय पद नसताना त्यांनी मतदारसंघांमध्ये सुमारे 40 कोटीहून अधिक रुपयांची विकास कामे केलेली आहेत. त्यांच्यातील याच नेतृत्व क्षमतेला पाहून मतदार संघातील मतदारांनी बहुमताने त्यांना विजय केले.

यापुढे त्यांनी मतदारसंघांमध्ये महिला, सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल व त्यांच्या चरितार्थ चालेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मनोदय बोलून दाखवलेला आहे. एकूणच काय तर मा. अशोकराव माने यांच्या विजयाने हातकणंगले मतदारसंघांमध्ये जुनी सर्व राजकीय समिकरणे बदलली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे आणि एका नवीन पर्वाला सुरुवात झाल्याच्या लोकभावना जनतेतून उमटत असताना दिसत आहेत.