आ. जयंत पाटील यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन

शिवाजीराव नाईक, आ.मानसिंगराव नाईक यांची प्रमुख करमाळे (ता.शिराळा) येथे आ.मानसिंगराव नाईक यांच्या विशेष प्रत्नाने मंजूर झालेल्या सुमारे ८ कोटी ५० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन, २० लाख रुपये खर्च करुन पूर्ण झालेल्या विकासकामांचे उद्घाटन माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.

भूमिपूजन झालेल्या कामामध्ये महाराष्ट्र जलसंधारण विभागाकडून मंजूर झालेला रुपांतरीत साठवण तलाव कामासाठी ६ कोटी १९ लाख ९७ हजार रुपये, आर. डी. एस. एस. योजनेतून १ कोटी ३४ लाख रुपये खर्चाच्या गावठाण फिडर २४ तास वीज पुरवठा व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करमाळे ते पुदेवाडीकडे जाणारा १ किमी रस्ता ८७ लाख २१ हजार या कामांचा समावेश आहे.२५/१५ योजनेतून १० लाख रुपये खर्च करून पूर्ण झालेले सामाजिक सभागृह व जनसुविधा योजनेतून १० लाख रुपय खर्चून पूर्ण झालेली स्मशानभूमीचे उद्घाटन करण्यात आले.

या सर्व कार्यक्रमास माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थित होते.प्रारंभी स्वागत व प्रास्तविक संचालक सुरेश पाटील यांनी केले. सरपंच सचिन पाटील, आमदार मानसिंगभाऊ व माजीमंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंतराव पाटील यांची भाषणे झाली.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी, विराज इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील, विश्वासचे संचालक सुकुमार पाटील, विश्वास पाटील, बाजार समितीचे उपसभापती विजय महाडीक, उपसरपंच अर्चना आढाव, सोसायटी अध्यक्ष रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष आनंदराव यादव, सुरुलचे सरपंच शंकर चव्हाण, बंडा नांगरे, वाटेगाव माजी सरपंच राजीव बर्डे, राजारामबापू कारखान्याचे संचालक अतुल पाटील, निगडीचे सरपंच गणपती भालेकर, राजाराम पाटील, जे. बी. पाटील, पोलीस पाटील मनिषा साठे, ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, निर्मला पाटील, सुमित्रा मदने, सुनील यादव, दीपक पाटील, राजाराम साठे, संगीता व अश्विनी पाटील आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.