छ. शिवाजीनगर गणेश उत्सव मंडळ, छ. शिवाजीनगर सांगोला, चेतनसिंह (बाळासाहेब) केदार- सावंत मित्रपरिवार सांगोला तालुका व आर. सी. सी. क्रिकेट क्लब छ. शिवाजीनगर सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला तालुका मर्यादित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. आमदार शहाजीबापू पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, उद्योगपती बाळासाहेब आसबे, संजय केदार, आनंदा माने, नाथा जाधव, शिवाजीराव गायकवाड, नवनाथ पवार, वसंत सुपेकर, सोमनाथ मरगर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
सदरच्या स्पर्धा न्यू इंग्लिश स्कुल क्रिडांगणावर पार पडणार आहेत.सांगोला तालुका मर्यादित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी २ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस व चषक चेतनसिंह केदार सावंत मित्रपरिवाराच्या वतीने द्वितीय बक्षीस १ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस व चषक पुण्यवंत खटकाळे आणि संजय केदार यांच्या वतीने तृतीय बक्षीस ७५ हजार रुपये व चषक नाथबाबा मंगल भांडार व केटरर्स आणि नाथबाबा डेकोरेटर्स यांच्या वतीने चतुर्थ बक्षीस ५० हजार रुपये व चषक आनंदा माने व यश जाधव यांच्या वतीने देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी १८ हजार ५०० रुपये ठेवण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी ज्योतिर्लिंग फ्रूट सप्लायर्स आणि व्रन्सपोर्टचे अनिल बंडू केदार यांचे विशेष अर्थसहाय्य लाभले आहे. तर चषकसाठी आदिनाथ उद्योग समूहाचे प्रमुख तथा राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे यांचे सहाय्य लाभले आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी साहिल तांबोळी यांच्या वतीने फ्रिज देण्यात येणार आहे. प्रत्येक मॅचसाठी सामनावीर चषक सावळेश्वर पेट्रोलियम शिवाजी शेजाळ यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ सिरीज साठी टायटन वर्ल्ड वर्ड यांच्यावतीने टायटन स्मार्ट वॉच फायनल मॅचमधील विजेत्या ११ खेळाडूसाठी न्यू बॉम्बे मोबाईल शॉपी तर्फे ब्लूटूथ हेडफोन, ऑरेंज कॅपसाठी हिंदवी स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे आकर्षक बक्षीस, पर्पल कॅपसाठी अभिजीत काटकर यांच्या वतीने आकर्षक बक्षीस व चषक देण्यात येणार आहे. फायनल मॅच रनर अप अकरा खेळाडूंसाठी श्रीराम उद्योग समूहाच्या वतीने आकर्षक घडयाळ देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेसाठी चौगुले सायन्स क्लासेसचे संजय चौगुले आणि सयाजी राजे पेंट्स अँड गणेश कलर वर्डचे सोमनाथ स्वामी यांचेही आर्थिक अर्थसाह्य लाभले आहे.
उत्कृष्ट संघनायक ५ हजार बक्षीस श्रीराम उद्योग समूहाच्या वतीने सर्वात जास्त षटकारसाठी ५ हजार रुपयांचे बक्षीस मुक्ताराम इंटरप्राईजेस सर्वात जास्त चौकारसाठी पाच हजार रुपयांचे बक्षीस प्रशांत इंगोले कृष्णा मेडिकल, सर्वात जास्त विकेट पाच हजार रुपयांचे बक्षीस बिडीकर बंधू, सलग चार षटकार पाच हजार रुपयांचे बक्षीस अमजद मुलाणी, फिरोज मुलाणी सहारा इंजीनियरिंग वर्क्स, प्रथम विकेट हॅट्रिक पाच हजार रुपयांचे बक्षीस विठ्ठल हार्डवेअरचे रोहित मोहिते, उत्कृष्ट संघ पाच हजार रुपयांचे बक्षीस बाबर ट्रॅव्हल्सचे तानाजी बाबर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पाच हजार रुपयांचे बक्षीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रताप देशमुख, उत्कृष्ट यष्टीरक्षक पाच हजार रुपयांचे बक्षीस रॉयल स्पोट्र्सचे भारत शिंदे, सलग चार चौकार पाच हजार रुपयांचे बक्षीस शिंदे ट्रेडर्सचे अनिल शिंदे यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी अफजल शेख, दीपक केदार, अनघा दत्त इंजिनिअरिंगचे बाळराजे देशमुख, दत्तात्रय जाधव कडलास, लझीज पिझ्झाचे सुयोग दिवटे, एस एस ट्रॅव्हल्सचे अरमान शेख, वास्तु कन्स्ट्रक्शनचे समाधान भालके, प्रेमा अलंकार ज्वेलर्सचे रोहित मिसाळ, एम लाईट एलईडी मॅन्युफॅक्चरिंगचे हेमंत माने, हॉटेल फाइव स्टार, महालक्ष्मी जम्बो झेरॉक्सचे सुनील पवार हॉटेल संगमचे नवनाथ केदार शिवरत्न ज्वेलर्सचे नलवडे बंधू व कदम बंधू जे. एन. फ्रुटचे बबलू पडूळे, शिवप्रसाद अर्थमूव्हर्सचे पप्पू पाटील, कृष्णा मेडिकल एखतपूरचे प्रशांत इंगोले, समर्थ प्लायवूडचे शिवकुमार शिंदे, बालाजी स्टील फर्निचरचे विनोद गायकवाड, अर्जुन लाइफस्टाईलचे कल्याण कांबळे, वाघमारे सरांचे कराटे कोचिंग क्लासेस, चैतन्य ड्रायक्लीनरचे भंडारे बंधू, विकी ऑक्सिजन गॅस एजन्सी विकास केदार, नंदकुमार केदार, द सांगोला मेडिकल स्टोअर्सचे लियाकत अली मुजावर, श्री कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेस श्रीधर देशपांडे यांचे अर्थसहाय्य लाभले आहे. सदरच्या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी किरण चव्हाण, राजू शिंदे, पिंटू शिंदे, इनुस नदाफ, विनोद काटकर, अक्षय जाधव, चिवळ्या कोळी, श्याम माळी, अविनाश गायकवाड, सोमा भडंगे, नागेश लोखंडे, जावेद सय्यद, आनंद लोखंडे, माचो सोनवणे, विनायक सोनवणे, चिमण सोनवणे, सुरेश जगधने, सागर कोळी, सौरभ देशपांडे, सनी दिवटे परिश्रम घेत आहेत.