निवडणूक होताच ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या गळ्यात पडणार राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ….

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदारसंघ हा महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे गेला होता. माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी राष्ट्र‌वादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उबाठाकडून निवडणूक मैदानात उतरले. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. दरम्यान, साळुंखे-पाटील यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाला जिल्हाध्यक्षाविना निवडणुकीला सामोरे जावे लागले होते.

निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्यासह संजयमामा शिंदे, राजन पाटील या तीन नावांची चर्चा होती. साळुंखे-पाटील यांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडणार असल्याचे बोलले जात आहे.