16 डिसेंबरपासून राज्यातील साखर कामगार जाणार संपावर

सरकारने साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांचे वेतन व सेवा शर्ती ठरविण्याबाबत त्वरित त्रिपक्ष कमिटी गठित करावी, साखर कामगारांचे थकीत वेतन मिळण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी साखर कामगारांनी दि.१६ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिला आहे.

साखर कामगार प्रतिनिधी मंडळाची पुण्यात बैठक झाली. या बैठकीला अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्यासह सरचिटणीस शंकरराव भोसले, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, राज्य साखर कामगार महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड पी. के. मुंडे, आनंदराव वायकर आदींसह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.