सुहासभैय्या आमदार व्हावे म्हणून केलेले नवस चाहत्याने केले पूर्ण……..

आमदार सुहास भैया बाबर विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर वेजेगाव तालुका खानापूर येथील सुशांत देवकर यांनी खरसुंडी येथील श्री. सिद्धनाथ देवाला केलेल नवस पूर्ण केले आहे. सुहास बाबर आमदार व्हावेत म्हणून विधानसभा निवडणुकीपूर्वी वेजेगाव येथील सुशांत देवकर यांनी वेजेगाव ते खरसुंडी पायी चालत दर्शनाला येईन असे खरसुंडी येथील सिद्धनाथ देवाला नवस केलं होतं. आमदार सुहास भैया बाबर हे विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. त्यामुळे सुशांत देवकर यांनी श्री सिद्धनाथ देवाला केलेले नवस त्यांनी पूर्ण केलेले आहे. याच गोष्टीची दखल घेत भूड येथील ग्रामस्थांनी स्वागत केले. खरसुंडीतून परत आल्यानंतर वेजेगाव ग्रामस्थांनी सुशांत देवकर यांचे स्वागत केले आणि आभार व्यक्त केले.