खानापूर शहरात मोकाट गायींची व बैलांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने त्यांचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.
खानापुरात काही वर्षांपूर्वी मोकाट गायी व बैलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती. कळपाने फिरणाऱ्या या जनावरांनी शहरात उच्छाद मांडला होता. जनावरे रस्त्यावरच बसत असल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. शहरालगतच्या शेतामधील पिके व केळीची झाडे ही जनावरे शेतात घुसून फस्त करत होती त्यामुळे परिसरातले शेतकरी त्रासले
होते.
आठवडा बाजारात जनावरांकडून व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. शहरातील शिवाजी चौकात या जनावरांच्या लागलेल्या भांडणात परिसरात लावलेल्या चार ते पाच दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
त्यामुळे त्रासलेले नागरिकांनी नगरपंचायतीकडे तक्रार केल्याने ही जनावरे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली होती- नगरपंचायतीने या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता नागरिकांतून जोर धरू लागली आहे.