खानापूर तालुक्यातील नागनाथनगरचे ग्रामदैवत श्री नागनाथ देवाच्या यात्रेला प्रारंभ

खानापूर तालुक्यातील नागनाथनगरचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहे. या यात्रेनिमित्त होणारा गेल्या दोनशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि संपूर्ण देशभर प्रसिध्द असलेला बगाड पळविण्याचा सोहळा सोमवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यावेळी भाविकांनी गुलाल व भंडाऱ्याची उधळण करत केलेल्या नागनाथाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषाने संपूर्ण नागनाथनगरी दुमदुमने गेली होती.

नागनाथ देवाच्या यात्रेचे सर्व ग्रामस्थ, यात्रा कमिटीचे सदस्य एकत्रित बैठक घेऊन नियोजन करतात. सर्व जातीधर्माचे लोक व मानकऱ्यांनी एकत्रित येवून बगाडाच्या बांधणी केली. मातंग समाजातील लोक बगाडाच्या बांधणीमध्ये दोर, सोल तयार करुन बांधणीस सुरुवात करतात. सुतार समाजातील लोक गाड्याला कणा बसवून देणे, बावकाड बसविणे, लाकडी तोरण, शिडी बसविणे अशी कामे करतात. तेली समाजातील लोक गाड्यांना वंगण करतात. बौद्ध समाजातील लोक घोडी लावतात, साकडे घालतात. देवाची मानाची सात बगाड आहेत. बगाड पळविण्याच्या सोहळ्यावेळी भाविकांनी गुलाल व भंडाऱ्याची उधळण करत नागनाथाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषाने नागनाथन दुमदुमने गेली होती. यावेळी भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.