वस्त्रनगरी म्हणून प्रसिद्धीस असलेल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या कामकाजाची नेहमीच सगळीकडे चर्चा असते. महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध विभागातील अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याने अनेक वेळा एकाच कामावर दोनदा खर्च पडतो. कामे केलेल्या ठिकाणी नव्याने कामे काढणे असे विविध प्रकार घडत असतात. खंजीरे इंडस्ट्रियल इस्टेटमधील जुने एस.टी. स्टँड परिसरात लाखो रुपये खर्च करून नव्याने केलेला हॉटमिक्स रस्ता गटारीचे नळ टाकण्यासाठी खुदाई करण्यात आला. अधिकारी वर्गाच्या समन्वयाच्या अभावामुळे रस्त्याच्या कामासाठी आणखी निधी खर्ची पडणार आहे. महानगरपालिकेच्या या अजब कारभारामुळे नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा रंगलेल्या आहेत.
Related Posts
अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला!
इचलकरंजी येथील डेक्कन चौक परिसरात ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोडणारी पिन निघाल्याने ट्रॉलीची धडक बसून मोपेडस्वार बाप-लेकाचा मृत्यू झाला. आनंदा सोपान गणपते (वय…
इचलकरंजीत महाशिवरात्री उत्साहात!
महाशिवरात्रीचा दिवस हा महाउत्सव म्हणून ओळखला जात असल्यामुळे शहरातील सर्वच शिवमंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. यादिवशी…
पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी ३४० कोटींची मंजुरी: शिंदे
पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीत जाणाऱ्या उर्वरित सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ३४० कोटी रुपयांची मंजुरी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.…